प्रादेशिक वाद म्हणजे जे देशापेक्षाा आपल्या प्रदेशाबद्दल आत्मीयता वाटणे . स्वातंत्र्यापासूनच प्रादेशिक वाद हे भारतीय राजकारणाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले आहे.परंतु ६०ते ९० च्या दशकात विविध प्रदेशांनी केलेल्या स्वायत्त्तेच्या व विभाजनाच्या मागण्यात वाढ झाली.व त्यामुळे देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण झाला होता . प्रादेशिकवाद ही एक अशी मनोवृत्ती आहे कि, ज्यात राष्ट्रीय अस्मितेपेक्षा प्रादेशिक अस्मितेला प्राधान्य दिले जाते . मी महाराष्ट्रीय ,तामिळ,पंजाबी अथवा बंगाली प्रथम आहे व भारतीय नंतर हि भावना त्यात दिसते .हि आत्मीयता त्यांच्या स्वत:च्या भाषेचे व संस्कृतीचे वेगळेपण जपण्याच्याा धडपडीतून आलेली दिसते .भारत हा विविधता असलेला देश असल्याने इथे प्रादेशिक आत्मीयता व भावना या राष्ट्रीय ऐक्यापेक्षा प्रबळ असल्याचे दिसून येते . प्रत्येक समूहाला त्यांची संस्कृती तसेच भाषा जपली जावी असे वाटते .
जेव्हा प्रत्येकजण आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यातून संघषॅ उद्भवतात .पण भारताने 'विविधतेतून एकता ' हे सूत्र स्वीकारले आहे . प्रांतवादातून ज्या समस्या निर्माण झाल्या ,त्या भारताने लोकशाही पद्धतीने हाताळल्या. प्रादेशिक महत्वाकांक्षेकडे भारत्तात राष्ट्रविघातक गोष्टी म्हणून बघितले जात नाही . या प्रादेशिक महत्वाकांंक्षांना संघराज्य व्यवस्थेमध्ये सामावून घेण्याचा आपण प्रयत्न केला आहे.
स्वातंत्र्यानंतर ज्यावेळेस केंद्र सरकारने हिंदी हि राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारली त्यावेळेस दक्षिणेकडील राज्यांनी त्याला विरोध केला होता. कारण हिंदी राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारल्यास आपल्यावर उत्तरेचा दबाव वाढेल अशी दक्षिणेकडील राज्यांना भीती होती . यातूनच दक्षिणेकडील 'हिंदी विरोधी' तर उत्तरेकडे 'हिंदीवादी' आंदोलनांना सुरुवात झाली .भारतातील भाषिक विविधता जोपासण्यासाठी मग आपण भाषावर प्रांतरचना केली .
अशाप्रकारे भाषेच्या आधारावर देशाचे विभाजन होऊ न देता आपण त्याला संघराज्याचा आधारावर बनविले पाहिजे . भारतातील प्रादेशिक हा प्रामुख्याने भाषेशी निगडीत आहे .
प्रादेशिक वादाची कारणे -: भारतात प्रादेशिक वादास अनेक घटक कारणीभूत आहेत .
(१) भाषिक अस्मिता
(२ )विषम आर्थिक विकास
(३)प्रादेशिक उपेक्षेची जाणीव
(४)प्रादेशिक राजकीय पक्ष
(५ )प्रादेशिक नेतृत्व
(१) भाषिक अस्मिता -: भाषा हे प्रदेश वादाचे प्रमुख आहे . भाषावार प्रांतरचना केल्यानंतरही द्विभाषी राज्यातील लोकांनी स्वत:च्या भाषेसाठी राज्य मिळावे म्हणून निदर्शने केली .उदा.महाराष्ट्र राज्य ,गुजरात राज्य आणि पंजाब व हरियाणा .
(२) विषम आर्थिक विकास -: विषम आर्थिक प्रगती हे प्रादेशिक वादाचे आणखी एक कारण आहे .भारतातील महाराष्ट्र ,गुजरात ,पंजाब हि राज्ये ईशान्येकडील राज्यापेक्षा तसेच बिहार ,उत्तर प्रदेश यासारख्या राज्यापेक्षा आर्थिकदृष्टया प्रगत आहे .या प्रगत राज्यांत पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत ,त्यांचे शहरीकरणाचे प्रमाणही जास्त आहे . अशा विषम आर्थिक प्रगतीमुळे मागास प्रदेशातून प्रगत राज्यांकडे लोक स्थलांतर करतात . यातूनच स्थानिक व स्थलांतरित यांच्यात संघर्ष उभे राहतात . मुंबईत तसेच महाराष्ट्रातील काही भागात उत्तर व दक्षिण भारतीयांविरुद्ध झालेली आंदोलने याचीच उदाहरणे आहेत .
(३)प्रादेशिक उपेक्षेची जाणीव -: सत्ताधीशांनी सातत्याने एखाद्या प्रदेशाची किंवा भागाची केलेली उपेक्षा तसेच प्रशासकीय व राजकीय व राजकीय सत्तेचे झालेले केंद्रीकरणसुद्धा प्रदेशवादास कारणीभूत ठरते. ईशान्येकडील राज्यातील प्रदेशवादास हा प्रामुख्याने या कारणामुळे आहे .
(४) प्रादेशिक राजकीय पक्ष -:काही प्रादेशिक पक्षाची सत्तेत येण्याची महत्त्वकांक्षा हि प्रादेशिक वादास कारणीभूत ठरते . द्रमुक ,तेलगु देसम ,अकाली दल, आसाम गण परिषद यासारख्या प्रादेशिक पक्षांनी सत्तेत घेण्यासाठी म्हणजेच मते मिळवण्यासाठी लोकांना प्रादेशिक आवाहने केलेली दिसतात .
(५) प्रादेशिक नेतृत्व -: अविकसित प्रदेशातील लोकांमध्ये आपणास डावलले.गेल्याची जाणीव निर्माण होताना दिसते .हि जाणीव प्रादेशिकतेच्या भावनेस कारणीभूत ठरते .केंद्र सरकार आपल्याला सामाजिक व आर्थिक विकासाकडे कसे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे व हि बाब प्रादेशिक नेत्यांमार्फत लोकांसमोर मांडली जाते व आपणच या प्रांतासाठी लढणारे नेते आहोत , हे दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. यातून प्रादेशिक भावना प्रखर होतात