मध्ययुगीन काळात अनेक राज्य होऊन गेलेत पण शिवकालीन आणि मुघल साम्राज्य हे मध्ययुगीन काळातील सर्वात महत्त्वाचा काळ मानला जातो . त्या काळातील सर्वात महत्त्वाचे शस्त्र म्हणजे तलवार आणि ढाल.ह्याच तलवार आणि ढालीची छोटीशी ओळख करून देण्याचा प्रयत्न या ब्लॉग मार्फत करत आहे.
तलवार
प्रकार-: खंडा तलवार (मराठा),राजस्थानी (राजपुती),समशेर (मोघली),मानकरी तलवार,पट्टा ,कर्नाटकी थोप,आरमार तलवार,गुर्ज
तलवारीच्या मुठीवरूनच तलवारीचे सुमारे ४० उपप्रकार पडतात. मुठी,तांबे,पोलाद,पितळ,हस्तीदंत,किरच,तेग,सिरोही,गद्दारा, कत्ती इ.उपप्रकार पडतात. मुल्हेरी,फटका हे मराठा तलवारीचे काही प्रकार आहेत.
तलवारीचे खजिना ,नखा ,ठोला ,गांज्या ,अग्र ,परज असे २२भाग दाखवता येतात. पाते पोलादी असे . वापरण्यात येणारे पोलाद टोलेडो,चंद्रवट,हत्तीपागी ,फारशी ,जाव्हारदार प्रकारचे असे
सासवड जवळील सोनारी गावचे मल्हार रामराव पानसे यांनी खंडोबाला अर्पण केलेली तलवार सुमारे ४२ किलो वजनाची आहे. अश्या प्रकारची तलवार भव्य व तसेच वजनी तलवार भारतात आहे. हि तलवार युद्धात वापरली जात नव्हती. हि तलवार तुम्हाला जेजुरी गडावर दिसते.

(भवानी तलवार)
मराठा तलवार -: तलवार आणि मराठे याचा संबंध शिवकालीनपूर्वी पासून आढळतो. शिवकालीनपूर्वी मराठ्यांच्या तलवारी या थोड्याशा जाड पण लांबीला कमी असायची मराठे हे उंचीला मध्यम आणि त्याची तलवार सुद्धा लांबीला कमी असायची. परंतु जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा काळाला सुरुवात झाली. म्हणजेच शिवकालीन कालखंड असे आपण म्हणतो. तेव्हा महाराज्यांचा असे लक्षात आले. कि मुघलांबरोबर मराठ्यांना युद्ध करावे लागेल. परंतु मुघल हे उंचीला आणि ताकदीला खुप मोठे होते.आणि मराठे हे उंचीला मध्यम होते. त्यामुळे महाराजांनी याचा सखोल अभ्यास केला आणि त्यांना असे लक्षात आले.कि मराठ्याची शाररिक ठेवणं हि लहान आणि तलवार ची लांबी कमी असल्यामुळे मराठा हा युद्धात कितीही पराक्रमी असला तरी त्याला पराभव पत्करायला लागत असे.महाराजांच्या दूरदर्शी बुद्धिला समजू लागले होते कि मराठ्यांच्या पराभवाचे कारण काय होते . ते म्हणजे योग्य व्यक्तीकडे योग्य शस्त्रे नसणे. मग त्या गोष्टी वर संशोधन सुरु झाले. महाराजांनी यावर सर्व बाजूंनी म्हणजे शस्त्राचा लांबी ,रुंदी ,धातू ,धार,वजन या सर्वांवर विचार करून नवीन शस्त्रे बनवायला घेतली गेली. मराठे शिवकालीनपूर्वी ज्या तलवारी वापरायचे त्या उघडी मूठ असायच्या. ती मूठ महाराजांनी बंद करून घेतली एखाद्या तलवारीचा वार घसरून खाली हातावर आला तरी हाथ सुरक्षित राहतो. यासाठी महाराजांनी मुठी ला आवरण लावलं. त्याचबरोबर तलवार जी थोडी जाड होती ती पातळ करून एक फुटापर्यंत आणखी लांब केली. पाते लांब केले परंतु तलवारीचे वजन वाढणार नाही याची काळजीही महाराजांनी घेतली . शत्रूच्या मोठ्यात मोठ्या घावानेही तलवार तुटणार नाही अशी व्यवस्था करून घेतली. त्यासाठी तलवारीला मधून पन्हळ ठेवला जाई. त्याचा प्रभाव इतका दिसून आला, कि हे हत्यार पायदळासाठी उपलब्ध व्हावी अशी गरज मावळ्यांनी व्यक्त केली. आणि अश्या तलवारीला जगभरात मराठा तलवार म्हणून संबोधले जाऊ लागले. महाराजांनी हि मराठा तलवार लांब केल्याने त्याच्या टोकाकडील वजनाचा तोल सांभाळताना मुठीवर वजन जास्त आल्यासारखे वाटे. त्याला पर्याय म्हणून तलवारीच्या मुठीच्या मागे गज लावायला सुरुवात केली. ऐन प्रसंगी हा गजही शत्रूच्या डोक्यात खिळ्याप्रमाणे ठोकत येई. त्यामुळे तोल साधण्याबरोबर तलवारीच्या मारक समतेचे आणखी एक वैशिष्ट्य आपोआप भरीला आले. अनेक प्रकारे हि तलवार चालवून हाताला घाम येईल किंवा मूठ सैल झाल्याने हातातून पडू नये. पकड एकदम मजबूत राहावी म्हणून मुठीला आतून गादीचे अस्तर लावून घेतले. म्हणूनच मराठे घोडखिंडीत सात तास सलग हत्यार चालू शकले. मराठ्यांच्या या विकसित तलवारीना त्यातील वेगवेगळ्या वैशिष्टयामुळे नावे पडली जसे धोप, खंडा, फिरंग, कत्ती, समशेर इत्यादी महाराजांच्या तलवारीही अश्या खास वैशिष्टयांनी बनवलेल्या आहेत
तलवारी प्रकार - चित्र साभार - अभिजित राजाध्यक्ष{सेनापती येसाजी कंक यांच्या तलवारी}
धोप तलवार (दुधारी)
(कोफ्तागिरी असलेला खंडा)
(मुल्हेरी मुठ)
{नक्षीकाम केलेल्या तलवारी}
(१) हिंदू कटोरी किंवा लवंगी ठोला असलेली मूठ, (२) जडावकाम केलेली हिंदू-मुस्लिम मिश्र घाटाची मूठ, (३) मंडलाग्र व योनी चिन्हांकित नायर तलवार, (४) मुस्लिम शैलीची मूठ, (५) खोपडी मूठ असलेला पट्टा, (६) सोसून पट्टा, (७) हिंदू पद्धतीचा खंडा, (८) हिंदू कटोरी मुठीचा औरंगजेबाचा खंडा, (९) हिंदू मुठीची द. भारतीय (कुकरी/खुरपी) तलवार, (१०) इराणी मुठीची तलवार.
पूर्वी तलवार चालविण्याच्या शिक्षणाचा प्रारंभ ⇨फरीदग्याने होई. फरीदग्यानंतर तलवार बंदेश (वार आणि डावपेच) लाकडी तलवारीने शिकविले जात. पट्टा चालविण्याचे शिक्षण लाठी-काठीच्या डावांनी दिले जाई. तलवार व पट्टा यांचे तडफी, सरका, डुबी, काटछाट, हूल, गर्दनकाट इ. बंदेशांचा सराव केळीच्या खांबावर केला जाई. महाभारतात बावीस बंदेश सांगितले आहेत. तलवार बंदिस्त ठेवण्यासाठी चामड्याचे किंवा धातूचे म्यान असते. हे म्यान कमरेला अडकविण्यासाठी कमरबंद किंवा कातडी पट्टे असतात.
(राजपुती मुठ - सोन्याची कोफ्तागिरी}
मुठीचा एक प्रकार -मेंढा
मुठीचा एक प्रकार -व्याघ्र
(अप्रतिम नक्षीकाम असलेला खंजीर)
{मुघल पट्टा}
(जगदंबा तलवार परज आणि गादी )
ढाल हि तलवारीच्या वारामुळे सहज तुटत नाही कारण कातडे ,बांबू आणि वेत हे तलवारीचा माराचा वेग जिरवून घेण्याची क्षमता त्यांच्यात असते .तांबे ,पितळ धातूतही हि क्षमता आढळते. ढाल हि सहज पंजात धरता यावी यासाठी नरम चामडी मुठी ठेवतात . ढाल हि खांद्यावरती सहज लटकावी यासाठी तिला पट्टे असतात. ढालीचा सांगाडा लाकडी बांबूचा व धातूचा असतो . ढालीच्या सांगाड्यावर पृष्टावरण चढविले जाऊन त्यात वरोगण लागवण्यात येते तसेच या ढालीच्या पृष्ठाभागावर शंक्वाकार गुटणेदेखील ठोकतात. हा पृष्ठभाग जेवढा गुळगुळीत आणि ढाळदार जेवढा तेवढा शस्त्राचे आघात निसटते होतात . यामुळेच मराठ्यांच्या ढालीवर जेव्हा गोळी लागायची तेव्हा सहज ती निसटून लांब उडून जाई . ढाल चौकोनी,लांब,अर्धगोलाकार स्वरूपाच्या व तसेच तत्सम लांब ढालीपासून मराठ्यांचे व इतर सर्व यौध्याचे डोक्यापासून ते पावलापर्यंत संरक्षण होते . अशी बिनचिलखती ढाल पायदळ सैनिकांसाठी असते . ढालीच्या खोबणीतुन भालेपुढे घुसविता येतात . .ढाली ची तटबंदी सुद्धा उभी करता येतात . घोडेस्वार हा चिलखत दारी असल्याने त्याच्या ढाली आकाराने लहान असायच्या .अश्या चिलखतदारी असल्यामुळे त्या ढालीपासून फक्त त्याच्या चेहऱ्याचे संरक्षण होते . ढालीचा भाग हा त्रिकोणी आणि टोकदार ठेवल्यास त्यावरून शस्त्रांचे वार घसरतात परंतु हे वार चुकविण्यासाठी लहान ढालीला सतत फिरवावे लागत असे.
(जाळीचे चिलखत)
{ शिवाजी महाराजांची वाघनखे (रेसिडेंट ग्रांट डफ याने नेलेली)}
( कट्यारी पायदळ )
(छत्रपती शिवाजी महाराजांची सही)
( बिचवा )(छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्ऱ्यात मध्ये कैद होते तेव्हा महाराजांना तरुंगात पाठवण्याचे पत्र , बादशहाने फर्मान जाहीर केलेल्या पत्राद्वारे केलेल्या महाराजांच्या वर्णाद्वारे काढलेले महाराजांचे चित्र )
(रवींद्रनाथ टागोर यांनी काढलेला छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र )
संदर्भ:- शिवकालीन शस्त्रास्त्रे ,
इंस्टाग्राम :- SHIVRAY_TREKKERS,GOLDAN_ HISTORY_OF_SWARAJYA,GOLDAN_HISTORY_OF_MARATHA,007MARATHA,SHIVRAI_COLLECTION