मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२५

वीर मुरारबाजी देशपांडे

 * वीर मुरारबाजी देशपांडे



मुरारबाजी हे मराठा सैन्यातील शिलेदार होते. महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजीचे मुळ गाव होय. मुरारबाजी देशपांडे हे पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार होते.  इ.स.१६६५ साली मोघलांनी पुरंदर किल्ल्याला घातलेल्या वेढ्यात त्यांनी किल्ल्यांचे संरक्षण करत आणि मराठा सैन्याचे नेतृत्व करत कणखर अशी झुंज दिली पण याच लढाईत त्यांस वीरमरण आले.

इ.स.१६५६ मध्ये शिवरायांना जावळीच्या स्वारीतून एक अमुल्य रत्न मिळाले होते. या रत्नाचे नाव "मुरारबाजी देशपांडे" होते. मुरारबाजी देशपांडे हे सुरवातीला जावळीच्या चंद्रराव मोरे ह्यांच्याकडे काम करायचे. महाराजांच्या जावळीच्या छाप्याच्यावेळी चंद्रराव मोरे ह्यांचा पराभव करून त्यांची गादी उलटवली. याच छाप्याच्यावेळी महाराजांनी मुरारबाजीना पाहिले ते मावळ्यांना आडवे आले.मुरारबाजींनी मावळ्यांविरुद्ध तिखट तलवार चालवली. मावळ्यांना एक पाऊलही पुढे ते सरकून देत नव्हते. महाराजांनी मुरारबाजी मधील कर्तृत्व दुरून जाणले आणि त्यांना स्वराज्याचे महत्व पटवून देत त्यांस गोड शब्दात बोलुन आपलेसे केले. तेंव्हा पासुन महाराजांच्या प्रत्येक लढाईत आणि स्वराज्य कार्यात स्व:ताला समर्पित केले. पुरंदरला जेव्हा मुघल सरदार रजपूत मिर्झाराजे जयसिंग यांनी दिलेरखानाला सांगुन वेढा द्यायला सांगितला  तेव्हा पासून किल्लेदार म्हणुन पुरंदर किल्ला ते शर्थीने लढवत होते. पुरंदरावरील मराठयांनी मुघलांवर केलेल्या अचानक युद्धात त्यांनी पाचशे मुघल कापून जो पराक्रम केला ते पाहून दिलेरखानाने त्यांस आपलेसे करण्यासाठी जहागिरीचे अमीश दिले परंतु त्या जहागिरीच्या अमिशावर थुंकून त्यांनी स्वराज्याच्या कार्यात आपल्या चरित्राची, पराक्रमाची आणि स्वामीनिष्ठेची गाथा लिहिली. या लढाईत मुरारबाजी आणि तीनशे मावळे वीरगतीला प्राप्त झाले.


शाहिस्तेखानाची बोटे छाटल्यापासून ते सुरतेची लुट झाल्यानंतर महाराज स्वराज्य विस्तार वाढवत होते. तिथेच झाल्या घटनांपासून चवताळलेला मुघल बादशहा औरंगजेब ह्यांनी त्यावेळी हुशारीची एक खेळी खेळला. एका हिंदु राजाच्या समोर एक हिंदु राजाला पाठवले. म्हणजेच मुघली राजपुत सरदार मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखान पठाण यांस स्वराज्याच्या मोहिमेवर पाठवले. त्यांस हे चांगलेच ठाऊक होते की महाराज हि लढाई शांतपणे आणि सामंजस्याने सोडवून स्वराज राखण्यासाठी प्रयत्न करतील. पुढे जर युद्ध झालेच तर मात्र लढाई करून स्वराज्य राखतील.

झालेही असेच. मिर्झाराजे यांनी स्वराज्यात येताच धुमाकुळ घातला. महाराज त्यास हिंदु राजा म्हणुन सन्मान करत त्यास भेटीचे पत्र पाठवत पण त्यांस ते उत्तर नाही देत. या मुळे मात्र महाराज थोडे चिंतीत असत. त्यांची हि चिंता सरनोबत कुडतोजीराव गुजर यांस पाहवत नव्हती ते एकटेच धाडस करून थेट मिर्झाराजे जयसिंग ह्यांच्या छावणीत घुसले त्यांना जीवे मारण्यासाठी प्रयत्न केले पण मिर्झाराजे सावध असल्यामुळे त्यांनी त्यांचा हा डाव उधळला त्यांच्या शी युद्ध करून त्यांची तलवार पाडली त्यांस मिर्झाराजे यांनी विचारले तुम्ही कोण? त्यावर कुडतोजी राव म्हणाले "मी कुडतोजी, शिवरायांचा मावळा राजानी आम्हांस पाठवले नाही आम्ही स्वतः आलो आहोत भेटायला. तुम्हाला महाराज पत्र पाठवतात पण तुम्ही त्याचा जवाब पाठवत नाही. त्यामुळे महाराज चिंतेत असतात. ती चिंता आम्हांस पाहावली नाही म्हणून तुमच्यावर वार केला." हे ऐकून मात्र एकदम हुशारीने उत्तर देतात. ते म्हणतात तुमचा हा पराक्रम आम्हास आवडला परंतु एक सांगतो. राजांना शरण यायला सांगा. तुम्ही निर्धास्त इथून जा तुम्हाला तलवार आणि घोडा बक्षीस देऊन तुमचा सन्मान करून तुम्हाला तुमच्या सरहद्दीत आमचे सरदार सोडण्यासाठी येतील. राजांना हि बातमी समजली त्यांनी कुडतोजी रावांना बोलावून घेत त्यांस जवाब विचारला त्यांनी घडलेला प्रसंग सांगितला त्यांचे हे धाडस पाहून महाराजांनी त्यास "प्रतापराव" हि पदवी दिली.पुढे जाऊन ह्यांनी मराठ्यांच्या इतिहासात आपले एक सुवर्ण पान बनविले.

यामुळे मिर्झाराजे कसा आहे हे प्रताप रावांमुळे महाराजांना समजले. महाराजांना समजुन आले ह्यांच्याशी सरळ युद्ध करणे कठीण आहे. कारण ते खुप मुत्सद्दी आणि पराक्रमी आहे. ह्यांना भेटून मातृभूमी आणि मुघलांच्या विरोधात उभे करण्यासाठी प्रवृत्त करण्याची योजना करावी लागेल.

झाल्या प्रकारामुळे मिर्झाराजांनी महाराजांस पत्र पाठवले की "आम्ही तुम्ही एकच आहोत. आम्हास भेटण्यास येणे. आम्ही तुमचे आदर पुर्वक सन्मान करु" हे पत्र महाराजांस मिळताच ते विचार करू लागले की कोणास ह्या पत्राचे उत्तर घेऊन पाठवावे तेवढ्यात महाराजांनी रघुनाथ पंडित यांस पाठवायचे ठरवले. ते थोर शास्त्रपंडित आहे. त्यांस राजपुत शास्त्र चांगलेच ठाऊक होते. त्यांस बोलवून पंडितराव  हा किताब दिला आणि वस्त्रे अलंकार देऊन सन्मान पुर्वक शत्रूंच्या छावणीत सल्ला मस्लती साठी पाठवले. छ. शिवाजी महाराजांचे पंडित आले आहेत हा समाचार मिर्झाराजांस मिळाला त्यांनी त्यांचा आदर सन्मानपूर्वक वस्त्रे अलंकार देऊन सन्मान केला. मिर्झाराजे आणि रघुनाथ पंडित यांचे बोलणे झाले. मिर्झाराजा बोलला की " दिल्लीच्या बादशाहा सोबत शत्रुत्व न धरणे त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा शेवट लागणार नाही.महाराजांनी आम्हास येऊन भेटणे आम्ही त्यांस बादशाहाशी भेट घडवून देऊ. जसा आमचा पुत्र रामसिंग तसा तुम्ही आहात.राजांनी आम्हांस येऊन भेटणे. पंडित ह्या गोष्टी साठी विचारतात  जर भेट झाली तर राजांना काही दगाफटका तर होणार नाही ना! त्यावर मिर्झाराजे म्हणतो "

शिवशंकराच्या पिंडीवर हाथ ठेऊन बेल, भंडारा आणि शुद्धिपत्र घेऊन म्हणतो राजांना कोणत्याही प्रकारचे दगा होणार नाही." हे म्हणत त्यास गुप्तपणे सांगितले की राजांनी चार पाच महिन्यांनी येऊन भेटावे तोपर्यंत गड किल्ले लढवणे आणि पराक्रम दाखविणे. हा संदेश घेऊन राजांना सांगितले. महाराजांनी तात्काळ प्रत्येक गडावर आदेश पाठवले की सैन्य तयार ठेवा. 

       महाराजांचा दुत येऊन गेल्याचे समजताच. दिलेरखान चवथाळला तो म्हणाला,"शेवटी हिंदुस हिंदु मिळाला. तो दुसऱ्यादिवशी मिर्झाराजास म्हणाला "काय म्हणून सल्ला मस्लत केली. जवळच कोंढाणा आणि पुरंदर आहे. आम्ही पुरंदर घेतो तुम्ही कोंढाणा घ्या. त्यावर उत्तर देत मिर्झाराजा बोलला की गड न घेणे मुलुख काबीज करावा. गडास कोणतेही सामान(सैन्य , जेवण, हत्यारे) पोहचवून न देणे. म्हणजे गड आपोआप हाती येतील. खान रागात येऊन म्हणाला आम्ही पुरंदर घेतो तुम्हाला कोंढाणा घ्यायचा असेल तर घ्या. असे म्हणत खान निघाला.

      इ.स.१६६५च्या आषाढात (जुन/जुलै) पुरंदरास दिलेरखानानी वेढा घातला. पुरंदर वेढा घालण्यासाठी दिलेरखानाने पाच हजार पठाण, दहा हजार बैल तोफा घेऊन आले, पेंढारा च्या आत तलवारी , खलाशी लोक वीस हजार घेऊन दिलेरखान पुरंदर जिंकण्यासाठी आलेला. त्यावेळी पुरंदर चे किल्लेदार राजांचे विश्वासू शिलेदार मुरार बाजी देशपांडे होते. त्यावेळी गडावर हजार मावळे आणि वज्रगडाचे हजार मावळे होते. असे मिळुन किल्यावर दोन हजार मावळे होते. त्यामुळे पुरंदर किल्ला लवकर हाती येईल असे दिलेरखानास वाटले. महाराजांस असे वाटले की कमी सैन्यबळ असल्यामुळे आपण काही सैन्यबळ पाठवावे परंतु खानाची फौज आणि त्यामागून काही सरदार आणि मिर्झाराजांची फौज हे गडाच्या दिशेने जाणाऱ्या वाटा अडवून बसले होते त्यामुळे सहसा पुरंदरास जाणे अवघड होते कारण जर एक सैन्याची तुकडी तोडल्यास लगेचच मागून मिर्झाराजांची आणि मुघल सरदारांची फौज येईल आणि आपणच कोंडीत फसल्यासारखे होईल. त्यामुळे आपण सैन्य इच्छा असुन देखील पाठवू शकत नसल्यामुळे या गोष्टीचे महाराजांना फार वाईट वाटत होते.

      

     (नकाशा :-https://www.facebook.com/story.php?story_fbid=2205620996344114&id=100068762172808)

     

दिलेरखान सारखा संतप्त आणि गर्विष्ठ मुघल सरदार पुरंदर घेण्यासाठी दिवस रात्र तोफांचे मारा करत आणि मुघली सैन्य गड चढण्याचे प्रयत्न करीत पण मावळे त्यांस रोखीत आणि गड हा उंच जागी असल्यामुळे तोफांचा मारा सहसा तटबंदीस लागत नव्हते. पुरंदर सहसा हाती येत नसल्यामुळे त्यांनी पुरंदरचा बालेकिल्ला असलेल्या वज्रगडावर तोफा मारायला सुरुवात केली.  त्यामुळे वायव्य कडील असलेली तटबंदी ढासळली. तत्कालीन नियुक्त झालेले वज्रगडाचे किल्लेदार यशवंत बुवाजी प्रभु आणि त्यांचे बंधु बाळाजी प्रभू ह्यांनी तीनशे मावळ्यांना घेऊन जवळ जवळ पंधरा दिवस किल्ला लढवला. मुघल सैन्यांनी वज्रगडाच्या सफेद बुरुजाची पायथ्याशी विस्फोटके लावुन तटबंदी ढासळवली आणि काळ्या बुरुजावर तोफांचा मारा करुन वज्रगडाचा काळा बुरुज पाडून वज्रगड मुघलांनी जिंकला.


 पुरंदरचा बालेकिल्ला असलेला वज्रगड पडला. वज्रगड शत्रूंच्या हाती आल्यामुळे पुरंदरावर तोफाचां मारा सुरू झाला. या परिस्थितीतही मुरारबाजी गड लढवत होते. 


       मुरारबाजीच्या मनात एक धाडसी विचार आला काही मुबलक मावळे घेऊन थेट छावणी वर हल्ला करून तोफा निकामी करायच्या त्यामुळे पुरंदराची तटबंदी डळमळीत होणार नाही. त्याच रात्रीच्या वेळी काही मावळ्यांची तुकडी घेऊन मुघल सैन्य बेसावध असताना मावळ्यांनी मुघल छावणी घुसून हल्ला चढवला. त्यामुळे एकच चकमक उडाली. मावळ्यांनी लवकरात लवकर तोफांची आग लावायची बत्ती हातोडी मारून ती बुजवून टाकली त्यामुळे तोफा आता निकामी झाल्या. बाकीचे सैन्य लढाई ला येईपर्यंत मुरारबाजी आणि मावळे हे गडावर सुखरूप पोहचले. ह्याचा फायदा असा झाला की आता दिलेरखानाला पुढची मदत मिळेपर्यंत डोंगर दऱ्यात येऊन युद्ध करावे लागणार होते आणि मावळ्यांना डोंगरदऱ्यात हरवणे अशक्य आहे हे दिलेरखानास चांगलेच ठाऊक होते.


    इ.स.११ जून१६६५ चा तो भयाण दिवस उजाडला. तोफा निकामी केल्याच्या घटनांमुळे मुरारबाजींचा आत्मविश्वास वाढला त्यांना हे ठाऊक होते की आता सहसा मुघल सैन्य आक्रमण करणार नाही. दिलेरखानाला जर रसद आणि तोफा मिळाल्या तर पुरंदर गड पडल्याशिवाय राहणार नाही जर आताच पुन्हा एकदा आक्रमण केले तर दोन गोष्टी घडतील पहिली "जर युद्ध झाले आणि दिलेरखानाला मारून मुघल सैन्याला माघारी फिरवले तर विजय आपलाच होईल. वज्रगड पण हाती येईल आणि पुरंदरसाठी ते चांगलेच हिताचं ठरेल" आणि दुसरी "जर युद्धात अपयश आले तर स्वराज्याच्या कार्यात कामी होण्याचं भाग्य लाभेल."


     हा विचार करून अवघे सातशे मावळे घेऊन आणि स्वतः दोन्ही हातात फिरंगी तलवार घेऊन मुरारबाजी गड उतरून युद्धाला गेले. पण ह्यावेळी मात्र दिलेरखान सावध होता त्याला माहीत होते की आता मावळे कधीही आक्रमण करतील.मराठयांनी पुन्हा एकदा अचानक मुघलांच्या छावणीवर हल्ला चढविला. सावध असलेल्या दिलेरखानानी देवडी (आताचे देवाडी) पर्यंत पळत एका मोकळ्या जागेवर येऊन थांबला. तिथपर्यंत येई पर्यंत मुरारबाजी यांनी स्वतः पाचशे मुघल सैन्य मारले. देवडी वर येताच मोघलानी प्रतिकार म्हणुन मावळ्यांवर बाण चालवले. या बाणामुळे साठ मावळे वीरगतीला प्राप्त झाले. यामुळे मुरारबाजींना वाईट वाटले. "महाराजांचे नावाजलेली लोक या लढाईत खर्ची झाली आता महाराजांस काय मुख दाखवू" असे मनातल्या मनात म्हणत दिलेरखानाच्या दिशेने पुढे सरकत मुघल सैन्य कापत दिलेरखानाजवळ आले. त्यांच्या हा पराक्रम पाहुन दिलेरखान युद्ध थांबवून त्यास म्हणतो "अरे वाह! समशेर बहादुर तुझा पराक्रम पाहुन मी खुश झालो. अरे तु कौल घे मोठा मर्दानी शिपाई म्हणून तुझ नावाजितो " यावर चवताळलेले मुरारबाजी त्यास म्हणाला" तुझा कौल घे म्हणजे काय?,आम्ही शिवाजी राजांचे शिपाई, तुझा कौल घेतो काय? असे म्हणत पुन्हा युद्ध सुरू करून मुघल सैन्याला कापत मुरारबाजी ने दिलेरखानाच्या दिशेन झेप घेतली.मुरारबाजी दिलेरखानावर तलवार उचलणार तितक्यात दिलेरखानने  त्याच्यावर बाण मारला.

मुरारबाजी पडला आणि त्याचवेळी दिलेरखान म्हणाला " "असा शिपाई खुदा ने पैदा केला".

      मुरारबाजी आणि तीनशे मावळे वीरगतीला प्राप्त झाले.आणि ४००मावळे परत गडावर पोहचले. दिलेरखानाने शपथ घेत म्हणाला"जेव्हा गड घेईल तेव्हाच पगडी घालेल" अशी त्यांनी प्रतिज्ञा केली." आणि गडाला वेढा घालून बसला. मुरारबाजी पडला म्हणुन काय झाले आपण हा गड शर्थीने लढवू, आम्ही तैसेच शुर आहोत.असे म्हणत मावळे पुन्हा युद्ध करायला लागले.

    हि बातमी महाराजांस कळाली महाराजांस खुप दुख झाले. त्यांनी मिर्झाराजेस तात्काळ भेटण्यासाठी पत्र पाठवले. महाराज मिर्झाराजेस भेटून त्यांनी पुरंदरचा तह केला.


स्वामिनिष्ठ मुरारबाजी हे स्वराज्याचे प्रती एकनिष्ठ होते. त्यांचे देशासाठी, मातृभूमीसाठी एकनिष्ठ कसे व्हावे हे गुण आपण शिकले पाहिजे.


लवकरच त्यांच्या जीवनावर आधारित शिवराज अष्टक या चित्रपट मालिकेतून दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे  नरवीर मुरारबाजी देशपांडे हा चित्रपट आणणार आहेत.


संदर्भ :-

 १) सभासदांची बखर, कृष्णाजी अनंत विरचित पान क्रमांक -४० ते ४३ पर्यंत.


२)नकाशा:-https://www.facebook.com/story.php?story_fbid=2205620996344114&id=100068762172808


3) राजा शिवछत्रपती मालिका २००८ , Ep-१४८  ते १६० 


४) https://www.discovermh.com/murarbaji-deshpande/


५) मुरारबाजी यांचे चित्र : - https://www.esakal.com/manoranjan/historical-marathi-movie-on-veer-murarbaji-deshpande-release-date-nsa95



लवकरच काही न ऐकलेल्या मावळ्यांची आणि त्यांच्या पराक्रमाची माहिती मी माझ्या ह्या ब्लॉग च्या माध्यमातून देणार आहे. आणि ते पण ऐतिहासिक कागपत्रे द्वारे ते मांडण्याचे प्रयत्न करीत आहे. जर कोणास काही ऐतिहासिक संदर्भ माहीत असेलेले लेख,पुस्तके (pdf) असेल तर त्यांनी मला comment box मध्ये सांगावी. जेणे करून ते अधिक प्रभावीपणे मांडण्यास मदत मिळेल.  


छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🏻🚩

जय महाराष्ट्र 🙏🏻 🚩



रविवार, २७ डिसेंबर, २०२०

लेह लडाख - प्रवासवर्णीय ब्लॉग

 

लेह लडाख

लेह लडाख पर्यटन स्थळांतील अविस्मरणीयपैकी एक आहे. खूप साऱ्या पर्यटनातील लोकांना तसेच गिर्यरोहणातील लोकांना लेह लडाखची भटकंती अनुभवावी असे स्वप्न असते. निसर्गाचे सुंदर असे नंदनवन म्हणजे लडाख . खूप साऱ्या पर्यटन  करणारे लोकांचे व जगण्याचा आनंद देणारी जागा म्हणजे लडाख. अनेक पर्यटक लडाख ला जायला इच्छुक असतात. या प्रदेशातील प्रवास हा रोमांचकारी व उत्साही असतो. लडाख ला आजच्या काळात बरेच पर्यटक हे स्वतःचे दुचाकी वाहनांनवरून समूहाने प्रवास करतात. लडाखला जायची खरी सुरुवात हि जम्मूवरून पटनीटॉप मग तिथून श्रीनगरला जातो.जम्मू काश्मीर  हायवेवरचा प्रवास हा तुम्हाला वेगळाच  नंदनवनाचा अनुभव देऊन जातो.  तेथून नजर जाईल तिथपर्यंत निसर्ग सृष्टीचा रम्य असा अनुभव घेता येतो.लडाख मध्ये पॅरारायडींग, ट्रेकिंग आणि आईसस्केटिंग  थरारक अनुभव घेता येतो.



HIMANAK MIGHTY CHANGALA

 

जेव्हा आपण श्रीनगरला जातो तेव्हा कारगिल ला जाताना आपली भारतीय सेना किती खडतर परिस्थितीमध्ये  कार्यरत असते हे समजते. व ते पाहून आपल्याला आभिमान वाटतो. कारगिलच्या दक्षिणेला काश्मीरचे खोरे आहे आणि पश्चिमेला गिलगिट बाल्टिस्तान आहे. लष्करी दृष्ट्या ह्या भागाला खूप अतिशय महत्त्वाचा आहे. लेहा ला जाण्यापूर्वी कारगिल ला भेट देऊन तिकडे मुक्काम करता येतो.

द्रासचे खोरे हे लडाखचे प्रवेशद्वार म्हणूनही ओळखले जाते. द्रास हे आशिया खंडातील सर्वात थंड ठिकाण आहे तेथील हवामान हे खुप अतिशय थंड आहे द्रास ला पोहचल्यानंतर पर्यटकांची उत्सुकता आजुन वाढते. द्रास होऊन आपण जातो ते थेट लेह लडाख ला लेह हा पृथ्वीवरचा एक प्रकारे स्वर्ग आहे. तेथील निसर्ग सौंदर्ययाने  आपले भान  हरपून जाईल . हिमालयाची बर्फाच्छादित पर्वतशिखरे , सखल भूमी भागात नद्यांचे खळखळणारे पाण्याचे प्रवाह आणि पारदर्शी असे  शुद्ध  निळे पाणी, खूप खोल दऱ्या,तलाव , सरोवर  आणि तेथील हिरवळ.

 शहराच्या घाईगर्दीच्या शहरी जीवनातून येणारा ताण लेह लडाख ला आल्यावर निघून जातो. लेह लडाख वर गेल्यावर तुम्हाला शांतीचा अनुभव भेटतो.



                                                          द्रास गेट लडाख

 


लेह लडाख


लेह लडाख हे केंद्रशासित प्रदेश आहे .या प्रदेशाचे क्षेत्रफळ ४५,११० चौ.किमी आहे. व भारतातील प्रवास वर्गाचे आकर्षित व आवडीचे ठिकाणपैकी एक लेह लडाख आहे.येथील भाषा तिबेटी, उर्दू , लडाखी, शिणा व बलती आहे.  लडाख हे भारतातील उत्तर भागात असून काश्मीरच्या मोठ्या भागाचा हिस्सा आहे. येथील संस्कृती हि तिबेटियन संस्कृतीसारखेच आहे. लेह लडाख हा भारत,चीन,पाकिस्तान या देशातील सन १९४७ पासून चा वादाचा विषय ठरला आहे. लेह लडाख हा भारतीय संसदेच्या कायद्यानुसार ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी केंद्रशासित प्रदेश झाला. लेह हे लडाखमधील सर्वात मोठे शहर आहे. हीच लडाख ची राजधानी सुद्धा आहे. त्यानंतर कारगिल आहे. १९७९ मध्ये लडाख प्रदेश कारगिल आणि लेह जिल्हा विभागला गेला.


 नावाची व्युत्पत्ती :- लडाख हे नाव ला-ड्वॉंग या तिबेटी नावाने पडले या शब्दाचा अर्थ "उंच ठिकाणाची जमीन " असा होतो. लडाख भारतातील सिल्क रोडने जोडलेला आहे. हे बहुधा पर्शियन शब्दाचे रूपांतर आहे असा समज तेथील जनतेमध्ये आहे.    

 

लडाख मध्ये बौद्ध धर्म तसेच मुस्लीम धर्माचे लोक जास्त आढळून येतात. लडाखला आध्यात्मिक असलेली जागा असेही म्हंटले जाते. रायासी फोर्ट, प्यांग , लिकर, रॉयल पॅलेस असे अनेक मठ आपल्याला पाहायला मिळतात. लेहनलडाख मध्ये पाहण्यासारखे खूप काही आहे  लडाख  मधील पर्यटकांची   आवडती जाग म्हणजे तेथील सरोवरे. पॅंगॉंग सरोवर हे पर्यटकांना  आकर्षित करणारा सरोवर होय. लेह लडाखहुन हा सरोवर १६०. कि.मी. अंतरावर आहे. पँगॉग सरोवरातील निसर्ग रम्य शुद्ध निळे पारदर्शी 

 

                 

                   सैबेरियन क्रेन.



                                            
पॅंगॉंग सरोवर.


असे पाणी असते. तेथील हवामान संपूर्ण वर्षभर खूप छान असते. काळ्या मानेचे सैबेरियन क्रेन येते दिसतात. या दुर्मिळ पक्ष्यांची प्रजोत्पादनाची जागा आहे असे म्हटले जाते. सात तासाच्या अंतरावर त्त्समोरिरी हे सरोवर आहे. या सरोवराकडे जाणारा मार्ग आहे अतिशय दुर्गम आहे व तो मार्ग खोऱ्यातून जातो. या दुर्गम मार्गातून प्रवास झाल्यानंतर हा सरोवर पाहताना आनंद वाटतो. १२० ते १२५  किलोमीटर  अंतरावर प्रसिद्ध लामायुरू ट्रेक आहे व तिकडे अनेक पर्यटक गिर्यारोहणाला जातात. लडाखमध्ये  बर्फाच्छादित वाळवंट म्हणून 'नुब्रा व्हॅली'  आपल्याला पाहायला मिळतो.नुब्रा खोऱ्यातून नुब्रा नदी वाहते.तेथील "व्हॅली ऑफ फ्लॉवर्स" बघण्यासारखे ठिकाण आहे. "डिसकिट गुफा" हि येथील मोठी व प्राचीन अशी गुफा आहे तेथे ३२ मीटर उंच असा बुद्धांचा  पुतळा पाहण्यास मिळतो.

                                                                 

                                                                   खारदुंगला 

  


 

 

नुब्रा व्हॅलीकडे जाताना च खारदुगला खडीची  भुरळ पडते. तेथे अतिशय कठीण असतो.  वाहनाने प्रवास  करण्याइतका जगातील सर्वात उंचावरच्या रास्ता आहे. लडाख मध्ये शांती स्तूप आहे. प्राचीन आणि शाही सौंदर्याचा अविष्कार  आहे   या स्तूपामध्ये  जुनी, दुर्मिळ, हस्तलिखिते आहेत. लेह हा मध्ये पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे शेय मॉनस्ट्री येथे  बुद्धाचा धातूचा पुतळा आहे. लडाखमधील हा  दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पुतळा आहे. लेहपासून १५ कि.मी . अंतरावर हे ठिकाण असून लडाखचा राजा डेलडान नामग्याल याने १६५५ या मठाची स्थापना केली.

 

लेह लडाखचा प्रवास  करताना तिबेटी आणि लडाखी खाद्यपद्धतीचा आस्वाद घेता येतो. लडाख मध्ये धातूच्या शिल्पाकृती, पेंटिंग्ज  आणि शाली साठी प्रसिद्ध आहे. लेह लडाख मध्ये पर्यटकांना राहण्याची चांगली सोया आहे.लेह लडाख मध्ये काही सण साजरे केले जातात त्यापैकी लोसार आणि हेमिस.लडाख मध्ये चांगली हॉटेल्स आहेत. लेह लडाख मध्ये सप्टेंबर ते एप्रिल महिन्यातील प्रवास पर्यटकांसाठी अनुकूल समजला जातो.लेह येथून जिस्पा केलॉंग मार्गे मानसलीला जाताना  रोहतांग पासही पाहायला मिळते.मनालीहून मग चंदीगढमार्गे आपला परतीचा प्रवास सुरु होतो,पर्यटनाच्या सुखद आठवणी आयुष्यभर पुरतात.म्हणून आयुष्यात एकदा तरी लेह-लडाख जरूर पाहावे.

 

केव्हा जाल:  सप्टेंबर तो एप्रिल

कसे जाल:मुंबई - श्रीनगर -लेह लडाख  किंवा विमानाने मुंबई-लेह


फॅशन ब्लॉग

 

फॅशन ब्लॉग

फॅशन आजकाल हा  शब्द तरुणाई पिढी मध्ये चर्चेचा विषय आहे. वेगवेगळे ब्रँड हे सर्वाना अपवाद आहेत. मग ते कपडे, शूज , घड्याळ असो. पण त्याचंही सुरुवात हि जेम्स लेवर आणि फर्नाड ब्रूडेल यांच्यासह इतिहासकारांनी १४ व्या शतकाच्या मध्यात कपड्यांचे पाश्च्यात फॅशन सुरु केले. स्थानिक व जागतिक पातळीवर आज आशियाई फॅशन वाढत आहे. भारत , जपान ,चीन या सारख्या देशामध्ये पारंपारिकपणे मोठे वस्त्र उद्योग आहेत. जे खूप वेळा पश्चिम डिजायनारानी काढले आहेत. परंतु आता भारत देखील कपड्यांच्या शैली आता स्वत:च्या कल्पनेवर  प्रभाव पाडत आहे.  त्यामधील एक प्रकार म्हणजे डेनिम जॅकेट्स, हुडी आणि शूज.                                                                      


                            डेनिम जॅकेट्स


डेनिम जॅकेट्स-: डेनिम जॅकेट्स म्हणजे जीन्स जॅकेट्स आजकाल हि फॅशन लहान मुलांपासून ते आजच्या तरुणाई मध्ये दिसून येते. व ते परिधान करायला सुद्धा आवडत. बहुतांश जणांना डेनिम जॅकेट्स बदल गुवत्तेबद्दलची माहिती नाही आहे .डेनिम मध्ये एक विशिष्ट प्रकारचे फॅब्रिक असते . ज्यामुळे तुम्हाला जास्त गरम होऊ शकत नाही
,अश्या प्रकारचे जॅकेट ओंनलाइन व दुकानात उपलब्ध असतात.व ते तुम्ही परिधान करू शकतात.  डेनिम जॅकेट्स चा उपयोग तुम्हाला एक स्टायलिश लूक तुम्हाला देतो. व ते परिधान केल्यावर तुम्ही फॅशिनेबल दिसतात. डेनिम जॅकेट्स हे मुली सुद्धा परिधान करू शकतात. डेनिम जॅकेट्स मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत उदा; डेनिम शर्ट , शर्ट जॅकेट्स , मुलींसाठी डेनिम शॉर्ट ड्रेस, वर्कआउट लुक साठी डेनिम जॅकेट्स आणि ट्रॅक पँट वापरा इ, काही उदाहरण आहे.


               
हुडी

हुडी :- हुडी म्हणजे आताच्या टीशर्ट चे जॅकेट मध्ये रूपांतर आहे. आताच्या तरुणाई मध्ये हि फॅशन  क्रेज वाढताना दिसत आहे. हुडी चा अर्थ युरोप मध्ये पूर्वी टोपी असा होता. १९३० मध्ये अमेरिकेत थंडी च्या वेळी मजुरांना अचानक पणे उद्भवली  कपड्याची शैली होय. नंतर १९९० च्या दशकापर्यंत त्यामध्ये काही बदल करून एका व्यक्तीने हुडी विकायला सुरुवात केली नंतर१९९० च्या काळी हा शब्द युरोपात  प्रचलित झाला.नंतर त्यामध्ये काही बद्दल करून भारतात विकण्यात सुरुवात झाली. २१ व्या शतकाच्या सुरुवातीला हे कपडे कोण विकत घेत नसत नंतर पण आता च्या काळात हुडी ला आंतरराष्ट्रीय कपड्याच्या बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.  हुडी मध्ये आता मराठी कॅलिग्राफी हे एक नवीन प्रकार आला आहे. 

हुडी तुम्ही हि वर्कआउट करताना , फोटोशूट ला वापरावी.  



शूज




शूज ;-  फॅशन लुक  मध्ये तुम्हाला सर्वात जास्त मदत होते ती बुटाची म्हणजेच शूज ची होते. आता च्या काळात वेगवगळे ब्रँड हे बुटाचे सुध्दा आहेतबुटामुळे तुम्हाला क्लासिक लुक मिळतो. व तुम्हाला त्याचा फोटो काढताना फायदा खूप होतो. बुटांचा उपयोग तुम्ही जिम, जॉगिंग, स्पोर्ट्स यांसाठी होतो.आता च्या काळात वेगवगळे ब्रँड हे बुटाचे सुध्दा आहेत त्यापैकी काही वाजलेली नावे हि पुढीलप्रमाणे  उदा, NIKE , ADIDAS, PUMA   .                               

 












रविवार, २७ सप्टेंबर, २०२०

प्राचीन शिवकालीन ढाल तलवार आणि शस्त्रे

                 मध्ययुगीन काळात अनेक राज्य होऊन गेलेत पण शिवकालीन आणि मुघल साम्राज्य  हे मध्ययुगीन काळातील सर्वात महत्त्वाचा काळ मानला जातो . त्या काळातील सर्वात महत्त्वाचे शस्त्र म्हणजे तलवार आणि ढाल.ह्याच तलवार आणि ढालीची छोटीशी ओळख करून देण्याचा प्रयत्न या ब्लॉग मार्फत  करत आहे. 

                         

तलवार 

 प्रकार-:  खंडा तलवार (मराठा),राजस्थानी (राजपुती),समशेर (मोघली),मानकरी तलवार,पट्टा ,कर्नाटकी थोप,आरमार तलवार,गुर्ज  

 तलवारीच्या मुठीवरूनच तलवारीचे सुमारे ४० उपप्रकार पडतात. मुठी,तांबे,पोलाद,पितळ,हस्तीदंत,किरच,तेग,सिरोही,गद्दारा, कत्ती इ.उपप्रकार पडतात. मुल्हेरी,फटका हे मराठा तलवारीचे काही प्रकार आहेत.

   तलवारीचे खजिना ,नखा ,ठोला ,गांज्या ,अग्र ,परज असे २२भाग दाखवता येतात. पाते पोलादी असे . वापरण्यात येणारे पोलाद टोलेडो,चंद्रवट,हत्तीपागी ,फारशी ,जाव्हारदार प्रकारचे असे 

     



सासवड जवळील सोनारी गावचे मल्हार रामराव पानसे यांनी खंडोबाला अर्पण केलेली तलवार सुमारे ४२ किलो वजनाची आहे. अश्या प्रकारची तलवार भव्य व तसेच वजनी तलवार भारतात आहे. हि तलवार युद्धात वापरली जात नव्हती. हि तलवार तुम्हाला जेजुरी गडावर दिसते. 
(जेजुरी गडावरची प्राचीन खंडा तलवार )


ज्या तलवारी मध्ये साक्षात भवानी आई अवतारलेली अशी तलवार म्हणजे भवानी तलवार हि तलवार पोर्तुगीजांच्या  जहाजावर जेव्हा आक्रमण केले  आणि त्यां नंतर त्याच्या जहाजावर चा माल जप्त केला १६५८ तेव्हा पोर्तुगीजांकडून खेमसावंतकडे आणि  त्याच्याकडून महाराजांना हि तलवार भेट म्हणून देण्यात आली. पण जेव्हा अफजल खान स्वराज्यावर चालून आला तेव्हा मावळ्यांना स्वता:च्या जिवापेक्षा महाराजांचा जीव वाचणे हे महत्त्वाचं वाटू लागले. आणि त्यामुळे मावळ्यांमध्ये भीतीचे सावट वाटू लागले. तेव्हा मावळ्याची भीती घालवण्यासाठी भवानी आई  या तलवारात अवतरली अशी युक्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी लावली. हाच गैरसमज पुढे वाढत गेला.
 {छत्रपती उदयनराजे यांच्याकडे असलेली भवानी तलवार}
                                                                       (भवानी तलवार) 

मराठा तलवार -: तलवार आणि मराठे याचा संबंध शिवकालीनपूर्वी पासून आढळतो. शिवकालीनपूर्वी मराठ्यांच्या तलवारी या थोड्याशा जाड  पण लांबीला कमी असायची मराठे हे उंचीला मध्यम आणि त्याची तलवार सुद्धा लांबीला कमी असायची. परंतु जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा काळाला सुरुवात झाली. म्हणजेच शिवकालीन कालखंड असे आपण म्हणतो. तेव्हा महाराज्यांचा असे लक्षात आले. कि मुघलांबरोबर मराठ्यांना युद्ध करावे लागेल. परंतु मुघल हे उंचीला आणि ताकदीला खुप मोठे होते.आणि मराठे हे उंचीला मध्यम होते. त्यामुळे महाराजांनी याचा सखोल अभ्यास केला आणि त्यांना असे लक्षात आले.कि मराठ्याची शाररिक ठेवणं हि लहान आणि तलवार ची लांबी कमी असल्यामुळे मराठा हा युद्धात कितीही पराक्रमी असला तरी त्याला पराभव पत्करायला लागत असे.महाराजांच्या दूरदर्शी बुद्धिला समजू लागले होते कि मराठ्यांच्या पराभवाचे कारण काय होते . ते म्हणजे योग्य व्यक्तीकडे  योग्य शस्त्रे नसणे. मग त्या गोष्टी वर संशोधन सुरु झाले. महाराजांनी यावर सर्व बाजूंनी म्हणजे शस्त्राचा लांबी ,रुंदी ,धातू ,धार,वजन या सर्वांवर विचार करून नवीन शस्त्रे बनवायला घेतली गेली. मराठे  शिवकालीनपूर्वी ज्या तलवारी वापरायचे त्या उघडी मूठ असायच्या.  ती मूठ महाराजांनी बंद करून घेतली एखाद्या तलवारीचा वार घसरून खाली हातावर आला  तरी  हाथ सुरक्षित राहतो. यासाठी महाराजांनी मुठी ला आवरण लावलं. त्याचबरोबर तलवार जी थोडी जाड होती ती पातळ करून एक फुटापर्यंत आणखी लांब केली. पाते लांब केले परंतु तलवारीचे वजन वाढणार नाही याची काळजीही महाराजांनी घेतली . शत्रूच्या मोठ्यात मोठ्या घावानेही तलवार तुटणार नाही अशी व्यवस्था करून घेतली. त्यासाठी तलवारीला मधून पन्हळ ठेवला जाई. त्याचा प्रभाव इतका दिसून आला, कि हे हत्यार पायदळासाठी उपलब्ध व्हावी अशी गरज मावळ्यांनी व्यक्त केली. आणि अश्या तलवारीला जगभरात मराठा तलवार म्हणून संबोधले जाऊ लागले.  महाराजांनी हि मराठा तलवार लांब केल्याने त्याच्या टोकाकडील वजनाचा तोल सांभाळताना मुठीवर वजन जास्त आल्यासारखे वाटे. त्याला पर्याय म्हणून तलवारीच्या मुठीच्या मागे गज लावायला सुरुवात केली. ऐन प्रसंगी हा गजही शत्रूच्या डोक्यात खिळ्याप्रमाणे ठोकत येई. त्यामुळे तोल साधण्याबरोबर तलवारीच्या मारक समतेचे आणखी एक वैशिष्ट्य आपोआप भरीला आले. अनेक प्रकारे हि तलवार चालवून हाताला  घाम येईल किंवा मूठ सैल झाल्याने हातातून पडू नये. पकड एकदम मजबूत राहावी म्हणून मुठीला आतून गादीचे अस्तर लावून घेतले. म्हणूनच मराठे घोडखिंडीत सात तास सलग हत्यार चालू शकले. मराठ्यांच्या या विकसित तलवारीना त्यातील वेगवेगळ्या वैशिष्टयामुळे नावे पडली जसे धोप, खंडा, फिरंग, कत्ती, समशेर इत्यादी महाराजांच्या तलवारीही अश्या खास वैशिष्टयांनी बनवलेल्या आहेत


   

                                  तलवारी प्रकार - चित्र साभार - अभिजित राजाध्यक्ष
                                       {सेनापती येसाजी कंक यांच्या तलवारी} 
                                                               
धोप तलवार (दुधारी)  

                                                           (कोफ्तागिरी असलेला खंडा)       

                                                                 
                                           
                          (मुल्हेरी मुठ)



{धनुष्य-बाण ,कुर्हाडी आणि इतर शस्त्रे}     


                                                            

                                           {नक्षीकाम केलेल्या तलवारी}

वैदिक आणि इतर वाङ्‌मयात उदा., धनुर्वेद, वीरचिंतामणी, बृहत्संहिता, युक्तिकल्पतरु इत्यादींमध्ये करवाल, असि, निस्त्रिंश, चंद्रहास, खड्‌ग, मंडलाग्र, असियष्टि वगैरे नावे आढळतात. आधुनिक काळात प्रदेश, गाव किंवा विशिष्ट व्यक्तीवरून तलवारी ओळखल्या जातात. उदा., आलेमानी (जर्मनी), मुल्हेरी (मुल्हेर, महाराष्ट्र), हुसेनी, भवानी वगेरे. शुंगकालातील सरळ, रुंद दुधारी व बिनमुठीच्या (?) तलवारींचे स्वरूप भारहूत येथील शिल्पकामात आढळते. कुशाणकालात आखूड, सरळ, त्रिकोणी टोक असलेल्या व कण्हेरीच्या पानासारखे पाते असलेल्या तलवारी होत्या. गुप्तकालात खंडा तलवार प्रचारात आली. खंड्याची मूठ-ठोला लवंगी आकाराची असते. मध्ययुगातील तलवारीचे स्वरूप अदिचनल्लूर, अमरावती, नागार्जुनकोंडा, अजिंठा, वेरूळ, भूवनेश्वर, बादामी येथील शिल्पे व चित्रे यांतून होते. अरुंद, समांतर पण सरळ, दुधारी पाते आणि साध्या मुठी अशी त्या तलवारीची बनावट दिसते. वाकाटककालीन अजिंठा लेण्यांत दिसणारी तलवार ही टोकाला रुंद असलेल्या पात्याची दिसून येते. तिचे बामियान (अफगाणिस्तान) येथील बुद्धाच्या पाठीमागे असलेल्या चंद्रदेवाच्या तलवारीशी साम्य आहे. कोपीस म्हणजे मुठीखाली अरुंद पण टोकाकडे रुंद होणारे पाते असलेल्या तलवारींचे नमुने जावा-सुमात्रा येथील मंदिरशिल्पांत आहेत. तर खुरपी पात्याच्या तलवारींची दृश्ये अजिंठा-वेरूळ लेण्यांत आढळतात. खुरपी पात्याच्या तलवारी हिक्सॉस (इ. स. पू. अठरावे शतक) यांनी ईजिप्तमध्ये प्रसृत केल्या. खुरपी तलवारी (कुकरी, नायर) आजही केरळमध्ये आढळतात. वीरगळांच्या हातांतील तलवारी खंडा किंवा खुरपी धर्तीच्या आढळतात. तेराव्या-चौदाव्या शतकापासून भारतात इराणी व तुर्की तलवारी येऊ लागल्या. किर्क नर्दवान बिद्र, बेगमी, कुम व शुम या इराणी व याटगान; कोपीस या तुर्की तसेच घोडेस्वाराची समशेर व तेगू या तलवारी पूर्वी प्रचारात होत्या. आईन-इ-अकबरीत अशा तलवारींची वर्णने आहेत. मराठ्यांनी स्पेन, इटली, जर्मनी येथे तयार झालेली पाती घेऊन त्यांस हिंदुपद्धतीच्या लवंगी, डेरेदार व खोपडी मुठी बसविल्या. पट्टा, सकेला किंवा धूप आणि किरच या तीन तलवारी मराठी कल्पकतेतून तयार झाल्या आहेत. पात्यांची बनावट सुरुवातीस दमास्कनी या इराणी पद्धतीने व नंतर हिंदुस्थानी पद्धतीने करण्यात येई. पट्टा इतर तलवारींपेक्षा जास्त परिणामकारक आहे. भवानी तलवार ही ‘पट्टा’ पद्धतीची तलवार असावी, असा पाश्चिमात्य तज्ञांचा अभिप्राय आहे. कर्नाटकात ‘आद्य-कट्टी’ नावाची तलवार आढळते. हिचे पाते कोयत्यासारखे असते. टिपूचे सैनिक आद्य-कट्टी वापरीत. नेपाळात खंडा, कोश व कुकरी या प्रकारच्या तलवारी प्रचारात होत्या.


(१) हिंदू कटोरी किंवा लवंगी ठोला असलेली मूठ, (२) जडावकाम केलेली हिंदू-मुस्लिम मिश्र घाटाची मूठ, (३) मंडलाग्र व योनी चिन्हांकित नायर तलवार, (४) मुस्लिम शैलीची मूठ, (५) खोपडी मूठ असलेला पट्टा, (६) सोसून पट्टा, (७) हिंदू पद्धतीचा खंडा, (८) हिंदू कटोरी मुठीचा औरंगजेबाचा खंडा, (९) हिंदू मुठीची द. भारतीय (कुकरी/खुरपी) तलवार, (१०) इराणी मुठीची तलवार.

पूर्वी तलवार चालविण्याच्या शिक्षणाचा प्रारंभ ⇨फरीदग्याने होई. फरीदग्यानंतर तलवार बंदेश (वार आणि डावपेच) लाकडी तलवारीने शिकविले जात. पट्टा चालविण्याचे शिक्षण लाठी-काठीच्या डावांनी दिले जाई. तलवार व पट्टा यांचे तडफी, सरका, डुबी, काटछाट, हूल, गर्दनकाट इ. बंदेशांचा सराव केळीच्या खांबावर केला जाई. महाभारतात बावीस बंदेश सांगितले आहेत. तलवार बंदिस्त ठेवण्यासाठी चामड्याचे किंवा धातूचे म्यान असते. हे म्यान कमरेला अडकविण्यासाठी कमरबंद किंवा कातडी पट्टे असतात.

 (राजपुती मुठ - सोन्याची कोफ्तागिरी}

                                                             हस्तिदंती मुठ - उत्तर भारत
                                                                मुठीचा एक प्रकार -मेंढा
                                                              मुठीचा एक प्रकार -व्याघ्र
                                                       (अप्रतिम नक्षीकाम असलेला खंजीर)   
                                                         {मुघल पट्टा}
                                                    (जगदंबा तलवार परज आणि गादी )    

                                                    {मराठा पट्टा}

१७ व्या  शतकातील मोगल उदात्यांंच्या लुटलेल्या तलवारी सोन्याने आच्छादित तलवारीच्या मुठी , मोगल किंवा डेक्कन इंडिया १७-१८ व्या शतकात या मुठींना अरबी बेनिडिक्टरी शिलालेखानी सजावट केलेली आहे. २५ जून रोजी इस्लामिक आणि इंडियन वर्ल्डरच्या आर्ट्स क्रिस्टीजच्या लंडन येथे विक्रीसाठी देण्यात आलेल्या ७ तलवारीच्या मुठीचा एक संच आहे.  


(१७ व्या शतकातील मोघल उदात्ताच्या लुटलेल्या सोनेरी आच्छादित ७ तलवारीचे मूठ)        

शिवकालीन ढाल :- शत्रूच्या वारा पासून स्वता:च संरक्षण करून घेण्याचे जे साधन म्हणजे ढाल . ढाल गेली सुमारे  ६०००  वर्ष प्रचलित आहे . ढालीचे  वेगवेगळे प्रकार आहेत. (१) कठीण पृष्ठाभाग (२)ढाल धरण्यासाठी पकड  (३) ढालीचा सांगाडा त्याचे निरनिराळे आकारही असतात . उदा, चौकोनी , अर्धगोलाकार ,दुकोणी अर्धागोलाकार ,इंग्रजी आठ (८)या अक्षरयुक्त असलेली , त्रिकोणी , सपाट (फलक) असे ढालीचे प्रकार आढळतात. ढालीच्या प्रत्येक आकारामागे तुम्हाला विविध वैशिष्ठये आढळून दिसतील. प्राचीन काळी ढाली चा पृष्ठभाग हा गेंडा ,कासव , हत्ती ,बैल ,वाघ ,या जनावराच्या कातडी पासून तसेच ,बांबू , लाकूड ,धातूचे पत्रे वेट यांपासून बनवले जात होते . पण आताच्या ढाली प्लास्टिक पत्रे , बांबू ,लाकूड या पासून बनवले जातात उदा, तलवार बाजी शिकवताना येणारी ढाल हि प्लास्टिकच्या पत्राची असते  ,पोलीसी ढाली या पैकीच बनवली जाते.  .          

 
                                          (मराठा ढाली कासवाच्या पाठीच्या)




                                                          (गेंड्याच्या कातडीची ढाल)

(मोगल-मराठा ढाल)

                                                        (मोगल ढाल- संगीनजोड असलेली)
                             
                         (सम्राट अकबराची ढाल आणि तलवार - जे आर डी टाटा संग्रह)
                                                                   (राजपुती ढाल) 

ढाल हि तलवारीच्या वारामुळे सहज तुटत नाही कारण कातडे ,बांबू आणि वेत हे तलवारीचा माराचा वेग जिरवून घेण्याची क्षमता त्यांच्यात असते .तांबे ,पितळ धातूतही हि क्षमता आढळते. ढाल हि सहज पंजात धरता यावी यासाठी  नरम चामडी मुठी ठेवतात . ढाल हि खांद्यावरती सहज लटकावी यासाठी तिला पट्टे असतात.  ढालीचा सांगाडा लाकडी बांबूचा व धातूचा असतो . ढालीच्या सांगाड्यावर पृष्टावरण चढविले जाऊन त्यात वरोगण लागवण्यात येते तसेच या ढालीच्या पृष्ठाभागावर शंक्वाकार गुटणेदेखील ठोकतात. हा पृष्ठभाग जेवढा गुळगुळीत आणि ढाळदार  जेवढा तेवढा शस्त्राचे आघात निसटते होतात . यामुळेच मराठ्यांच्या ढालीवर जेव्हा गोळी लागायची तेव्हा सहज ती निसटून लांब उडून जाई . ढाल चौकोनी,लांब,अर्धगोलाकार स्वरूपाच्या व तसेच तत्सम लांब ढालीपासून मराठ्यांचे व इतर सर्व यौध्याचे डोक्यापासून ते पावलापर्यंत संरक्षण होते . अशी बिनचिलखती ढाल पायदळ सैनिकांसाठी असते . ढालीच्या खोबणीतुन भालेपुढे घुसविता येतात .  .ढाली ची तटबंदी सुद्धा उभी  करता येतात . घोडेस्वार हा चिलखत दारी असल्याने त्याच्या ढाली आकाराने लहान असायच्या .अश्या चिलखतदारी  असल्यामुळे त्या ढालीपासून फक्त त्याच्या चेहऱ्याचे संरक्षण होते .   ढालीचा भाग हा त्रिकोणी आणि टोकदार ठेवल्यास त्यावरून  शस्त्रांचे वार घसरतात परंतु हे वार चुकविण्यासाठी लहान ढालीला सतत फिरवावे लागत असे.

 

                                                   (जाळीचे चिलखत)

             
                             (अकबर बादशहाचे शिरस्त्राण,बाजूबंद,चिलखत)


 
                          { शिवाजी महाराजांची वाघनखे (रेसिडेंट ग्रांट डफ याने नेलेली)}
                                                                ( कट्यारी पायदळ )
                                                     (छत्रपती शिवाजी महाराजांची सही) 

 

                                                                     ( बिचवा )
(छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्ऱ्यात मध्ये  कैद होते तेव्हा महाराजांना तरुंगात पाठवण्याचे पत्र , बादशहाने फर्मान जाहीर केलेल्या पत्राद्वारे केलेल्या महाराजांच्या  वर्णाद्वारे काढलेले  महाराजांचे  चित्र )

      (रवींद्रनाथ टागोर यांनी काढलेला छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र )

संदर्भ:- शिवकालीन शस्त्रास्त्रे ,

इंस्टाग्राम :- SHIVRAY_TREKKERS,GOLDAN_ HISTORY_OF_SWARAJYA,GOLDAN_HISTORY_OF_MARATHA,007MARATHA,SHIVRAI_COLLECTION

वीर मुरारबाजी देशपांडे

 * वीर मुरारबाजी देशपांडे मुरारबाजी हे मराठा सैन्यातील शिलेदार होते. महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजीचे मुळ गाव होय. मुरारबाजी देशपांड...